
रावेर|प्रतिनिधी raver
रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार सुरू असून जनजीवन पूर्णपणे ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र या पावसाने पिकांची चांगली वाढ होणार आहे.
(raver) रावेर व परिसरात रविवारी रात्री झालेल्या पावसाने चिंब भिजवून काढले आहे. मुबई, नाशिक, पुणे, सुरत (Mumbai, Nashik, Pune, Surat) या महानगरामध्ये झालेल्या पावसाने शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली होती.
प्रंचड हाहाकार उडाला असल्याचे अनुभवता आले आहे.आता ग्रामीण भागात देखील तशीच परिस्थिती निर्माण होते का? असे चित्र दिसत आहे.रविवारी रात्रीपासून पाऊस पडत असल्याने, जनजीवन ठप्प झाले आहे.दरम्यान पडत असलेल्या पावसाने पिकांना फायदा होणार असून, बळीराजा वरुण देवतेवर खुश झाला आहे. सोमवारी रावेरात रस्त्यावर छत्र्या व रेनकोट घालून बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसाने तारांबळ उडाली होती. वाहनांची देखील गर्दी नव्हती.