पाळधी येथील तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू

पाळधी येथील तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू

पहूर,ता.जामनेर - वार्ताहर jamner

येथून जवळच असलेल्या (paldhi) पाळधी (College) येथील तरुणाचा आज सकाळी पहूर येथील खर्चाने फाट्याजवळ उभ्या असलेल्या (Container) कंटेनरला जोरदार (accident) धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

पहूर पाळधी येथील रहिवाशी समाधान देवसिंग परदेशी (वय 23) हा कॉलेज तरुण सकाळी (Soygaon) सोयगाव येथे (Examination) परीक्षा असल्यामुळे तो पेपर देण्यासाठी मोटरसायकल क्रमांक MH 19 BS 0235 या मोटरसायकली ने जात असताना (jalgaon) जळगाव औरंगाबाद (aurangabad) महामार्गावर पहूर जवळ खर्चाने फाटा दरम्यान पंचर झालेल्या उभी असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या हातापायाला डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे समाधान परदेशी याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली.

दरम्यान मयत समाधान परदेशी याचे पाळधी येथे महालक्ष्मी ग्लास अॅल्युमिनीयम वेल्डीग दुकान असुन गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन बहिणी असा परिवार आहे.

या अपघाताची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील, पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांना कळताच आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन मयत समाधान परदेशी याला ताबडतोब पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर अजय राठोड यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने पाळधी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com