छत्रपतींची उमेदवारी डावलण्यात या दोन पक्षांचे षडयंत्र

भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा आरोप
छत्रपतींची उमेदवारी डावलण्यात या दोन पक्षांचे षडयंत्र

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीने (Shiv Sena and NCP) दिशाभूल केली. त्यांची उमेदवारी डावलण्यात (Dismissal of candidature) सेना आणि राष्ट्रवादीचे षडयंत्र (Conspiracy) आधीच ठरल्याचा खळबळजनक आरोप (Allegations) भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन (Former BJP Minister Aa. Girish Mahajan) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतांना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ‘मन कि बात’ कार्यक्रमात जळगावातील सावखेडा शिवारातील वृध्दाश्रमातील संवाद (Dialogue in the old age home) कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी याठिकाणी भेट दिली असता पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित केला असता आ. महाजन यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने (bjp) अत्यंत प्रामाणिकपणे छत्रपती संभाजीराजेंना सहा वर्ष खासदारकी दिली होती. त्यावेळी आम्ही त्यांना कुठलीही अट घातली नव्हती. मात्र शिवसेनेने आमच्याकडे या अशा अटी घातल्या. त्यांना झुलवत ठेवले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे हे आधीच ठरवून केलेले षडयंत्र होते. विशेषत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि खा. शरद पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेच्या उमेदवारीत (Rajya Sabha candidature) डावलून त्यांना फसवल्याचा आरोप आ. गिरीश महाजन (Former BJP Minister Mla Girish Mahajan) यांनी केला. तसेच छत्रपती घराण्यात काय वाद आहे ? याविषयी आम्हाला काही माहिती नसल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com