
जळगाव - jalgaon
घरकुल प्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवर स्थगीती आहे. ही स्थगीती उठवावी यासाठी जि.प.चे आरोग्य आणि शिक्षण सभापती रविंद्र एस.पाटील व पवन ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी न्यायमुर्ती नागेश्वर राव आणि न्यायमुर्ती भुषण गवई यांच्या द्विपीठासमोर कामकाज झाले. दरम्यान देवकरांच्या विरोधातील याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे माजीमंत्री गुलाबराव देवकरांना दिलासा मिळाला आहे. माजीमंत्री देवकरांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकूंल रोहतगी व ॲड.अनिकेत पाटील यांनी काम पाहीले.