काँगेसच्या उमेदवार जनाबाई महाजन यांचा माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा

जिल्हा बँकेच्या निवडणुक; आणखी धक्कातंत्र
काँगेसच्या उमेदवार जनाबाई महाजन यांचा माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा

रावेर|प्रतिनिधी raver

जिल्हा बँक निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या,यात आमदार अरुण पाटील भाजप पुरस्कृत तर काँगेस कडून दोन उमेदवार रिंगणात उतरवल्याच्या घडामोडी घडल्या होत्या.

या नंतर दि.९ मंगळवारी दुपारी आणखी एक झटका काँग्रेसला बसला. यात जनाबाई महाजन यांनी अरुण पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने रावेरात खळबळ उडाली आहे. जनाबाई महाजन यांनी पाठिंब्याचे पत्र अरुण पाटील यांच्याकडे त्यांचे पती गोंडू महाजन यांच्यावतीने दिले,यावेळी राष्ट्रवादीचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील, डॉ सुभाष पाटील,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, नितीन पाटील (नेहता), ईश्वर पाटील (दोधा) यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com