जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये घोळ!

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना डावलून बदल्यांचा घाट
जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये घोळ!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad!) कर्मचार्‍यांच्या बदल्या (transfer) नुकत्याच पार पडल्या आहे. या बदल्यांमध्ये घोळ (In exchanges Confusion) झाला असून निवड समितीमध्ये जि.प.जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना (District Health Officer) डावलून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकार्‍याचा समितीमध्ये समावेश करण्याचा घाट कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित करीत या बदल्या रद्द करण्याची मागणी तक्रारदार (Complaint) दिनेश भोळे यांनी सीईओ तथा प्रशासक डॉ.पंकज आशिया (Administrator Dr. Pankaj Asia) यांच्याकडे केली आहे.

जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे यांच्या मार्फत करण्यात आल्या असून या बदल्या (transfer) प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. त्यात आरोग्य विभागातील सक्षम अधिकारी व विभागप्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ.भीमाशंकर जमादार यांची समितीमध्ये निवड करणे अपेक्षित होते.

आपण तसे न करता मनमानी पद्धतीने स्वत:च्या फायद्यासाठी डॉ.प्रमोद पांढरे हे प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसीम येथे वैद्यकीय अधिकारी (Medical officer) आहेत. त्यांना आपण समितीमध्ये अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून घेतलेले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी बदली प्रक्रियेच्या ठिकाणी उपलब्धता असताना वैद्यकीय अधिकारी मार्फत बदली प्रक्रियामध्ये सहभागी करण्याचा हेतू काय?

डॉ.प्रमोद पांढरे यांची मूळपदस्थापना ही प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसीम येथे असताना ते अनाधिकृतपणे (Unofficially) अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. व त्यांचे मूळ कर्तव्य प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसीम येथे रुग्णसेवा करण्याचे आहे. ते तसे न करता एकीकडे शासनाची तर दुसरीकडे रुग्णांना सेवेपासून वंचित ठेवून फसवणूक करीत आहे. त्यास सीईओ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करीत असल्याचा आरोप भोळे यांनी केला आहे.

बदल्या रद्दची मागणी

जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व कर्मचार्‍यांना आपल्या मूळ पदस्थापना ठिकाणी हजर करण्याबाबत 15 नोव्हेंबर 2021 रोजी तक्रार केली होती.तसेच डॉ.पांढरे यांनी कार्यमुक्त होऊन मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्यासंदर्भात तक्रार केली होती. तसेच मूळ ठिकाणी हजर न होणार्‍यांचे वेतन व भत्ते थांबविण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. डॉ.पांढरे हे वैद्यकीय अधिकारी असूनही आपण त्यांच्या संगनमताने चुकीचे व नियमबाह्य कामे करीत असल्याचा आरोप भोळे यांनी केला आहे. दि.13 मे रोजी आरोग्य विभागातील झालेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणीही भोळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com