ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन
USER

जळगाव - jalgaon

आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 (Covid-19) साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत (Oxygen plant) या क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरीता या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणेकरीता (Oxygen plant) अभ्यासक्रमाचा मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण (Skill development training) कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून एकूण 30 ईच्छूक व प्रशिक्षणास तयार असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षीत करावयाचे आहे.

प्रशिक्षणास प्रवेश घेणेस इच्छुक असणा-या उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा पात्रता खालीलप्रमाणे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : NTC (ITI) NAC Passed in Fitter/Welder/MMTM/RAC/Electrician/ Instrument Mechanic, AOCP/MMCP/IMCP Trade

प्रवेशासाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष

(Oxygen plant) या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण घेण्यास ईच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी (Google Form) भरणेसाठी दिलेल्या गुगल लिंकवर दि. 26 नोव्हेंबर, 2021 पर्यंत नाव नोंदणी करावी व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता वि.जा.मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com