
मुक्ताईनगर Muktainagar
आदिशक्ती संत मुक्ताई (Adishakti Saint Muktai) अंतर्धान समाधी (Antardhan Sohala) सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याची सांगता (Concluding) सोमवारी सकाळी प्रक्षाळ पुजेने (Prakshal Puja) होणार आहे.
संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा (Antardhan Sohala) नुकताच संपन्न झाला .ह्या कालात हजारो भाविकांनी मुक्ताई दर्शन घेतले. महोत्सव दरम्यान आईसाहेबांचे नित्यउपचार बंद असतात. त्यामुळे वारीनंतर प्रक्षाळ पुजा (Prakshal Puja) केली जाते. संपूर्ण गाभारा स्वच्छता करून आईचा क्षीणभाग जाण्याकरीता गरम पाणी उटणे ,आयुर्वेदीक काढे वापरून स्नान घालतात. उपस्थित भाविकांना मुर्तीस साखर निंबू लावता येईल.
पंचामृताने पवमान अभिषेक होईल तदनंतर आरती व महानैवेद्य दिला जाईल. पुजेनंतर आईसाहेबांचे दैनंदिन नित्यउपचार चालू होतील. अशी माहिती आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थानचे ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे यांनी दैनिक देशदूतशी बोलताना दिली. तरी भाविकांनी या पूजेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी , असे आवाहनही करण्यात आले आहे.
ज्या भाविकांना शक्य असेल त्यांनी दि.30-5-2022 सकाळी 6 वा मुळमुक्ताई मंदिरात हजर रहावे.