जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा वाढविली चिंता

सहा नवीन बाधित रुग्णांची नोंद; 16 अ‍ॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा वाढविली चिंता

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत (corona) पुन्हा एकदा वाढ (Increase once again)होत असल्याचे चौथ्या लाटेची शंका (Doubt of the fourth wave) व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सहा नवीन बाधित रुग्णांची नोंद (Record six new infected patients) करण्यात आल्याने नागरिकांची चिंता (Concerns of citizen) वाढू लागली आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून शासनाने याबाबत अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील तिसर्‍या लाटेनंतर सहा महिने नियंत्रणात असलेला कोरोना आता हळूहळू वाढू लागला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात 3, चोपडा 1 तर यावल 2 असे एकूण 6 नवीन बाधित रुग्णांची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

शाळा सुरु होताच कोरोनाचा प्रादुर्भाव

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. तिसरी लाट ओसरल्यानंतर जवळपास सहा महिन्यांपर्यंत कोरोनाची तिव्रता मंदावली होती. मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून चौथ्या लाटेचे संकेत देण्यात आले होते. त्यासंदर्भात केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यांनाही सतर्कतेबाबत 15 दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होत्या.

त्यामुळे राज्यात शाळा सुरू करण्याच्या पूर्वी टास्क फोर्सशी चर्चा करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार अनुदानित शाळा दि. 13 जूनपासून सुरू झाल्या आहेत. तर जिल्हा परिषद आणि खासगी प्राथमिक शाळा उद्या दि. 15 पासून सुरू होत आहे. शाळा सुरू होत असतांनाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालकांमध्ये आता भिती निर्माण झाली आहे.

मास्क वापरण्याचे आवाहन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा उपयोग करण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. कोरोना रूग्णांची संख्या अधिक वाढल्यास नियमावली कडक करण्याबाबत शासनाने जिल्हास्तरावर कळविले आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत दीड लाखाहून अधिक रूग्णांची नोंद

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजतागायत 1 लाख 51 हजार 575 बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 48 हजार 968 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आत्तापर्यंत 2591 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीला 16 अ‍ॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com