अमृत योजनेचे काम पूर्ण करा!

मनपाच्या आढावा बैठकीत मक्तेदारांसह अधिकार्‍यांना महापौरांचे निर्देश
अमृत योजनेचे काम पूर्ण करा!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे (poor road conditions) लवकरच शहरातील रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या (Amrut Yojana!) मक्तेदारांनी (monopolists) कर्मचारी संख्या वाढवून काम तात्काळ पुर्ण (Immediate completion) करण्याच्या सूचना महापौरांनी (mayor) अधिकारी व मक्तेदरांच्या आढावा बैठकीत दिल्या.

महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकेचे अधिकारी व मक्तेदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शहर अभियंता व्ही.ओ.सोनवणी, पाणी पुरवठा अभियंताजी.एम. लुले, सर्व शाखा अभियंता व अमृत पाणी पुरवठा योजनेचे मक्तेदार उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी शहरातील रस्त्यांची कामांना सुरुवात होण्यापुर्वी अमृत पाणी पुरवठा योजने संबंधीत संपुर्ण कामे पुर्ण करावे, शहरात होम टु होम सर्वे करुन नळ संयोजनांची माहिती घेण्यात यावी,अमृत योजने अंतर्गत मुख्य जलवाहिन्यांना कॉलनी परिसरातील जलवाहिन्या लवकरात लवकर जोडाव्या, अर्पाटमेंटस्, सोसायट्यांमध्ये ज्याकडे भुमिगत पाण्याच्या उपलब्ध असतील त्यांना एक इंचीचे एकच नळ संयोजन तसेच ज्याकडे भुमिगत टाक्या नसतील त्यांना प्रत्येकी नळ संयोजन देण्यात यावे, अमृत योजने अंतर्गत नळ संयोजनांची स्थिती काय आहे ? अद्यापपावेतो किती नळ संयोजन बाकी आहे याबाबतची माहिती त्यांनी घेतली. तसेच बैठकीत पाणी पुरवठा संबंधी यात प्रामुख्याने अमृत पाणी पुरवठा योजनेतील अडचणी, उपाययोजना व योजना लवकरात लवकर पुर्णत्वास आणणे बाबत चर्चा व नियोजन करण्यात आले.

ज्या प्रमाणे मालमत्ता कर संबंधी अभय योजना राबविली त्याप्रमाणे नळ संयोजनाची पावती वसूल करुन त्वरीत नळ संयोजन द्यावे तसेच सदर कार्यवाही कामी प्रत्येक युनिटवर कर्मचार्‍यांच्या नेमणुका करावी, शहरातील वाणिज्य संकुलांत एकच मोठे नळ संयोजन देण्यात यावे. सर्व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांना आपआपल्या प्रभागातील अमृत पाणी पुरवठ्याची कामे मक्तेदारामार्फत पुर्ण करुन टेस्टिंग करुन घेण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com