पाच दिवसात 100 टक्के लंपी लसीकरण पूर्ण करा!

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे निर्देश

संगहीत चित्र
संगहीत चित्र

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात लंपीचा कहर(Lumpy's Havoc) वाढल्याने गुरांमध्ये (cattle) मोठ्या प्रमाणात संसर्ग (infection) वाढला आहे. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात दि. 24 सप्टेंबर दुपारपर्यंत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे (Animal Husbandry Department of Zilla Parishad) 82 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील एकूण 7 तालुक्यामध्ये 100 टक्के लसीकरण पूर्ण (Vaccination complete) झाले आहे. उर्वरित लसीकरण येत्या 5 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात लंपीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या उपाययोजना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 5 लाख 71 हजार 53 पशुधनांपैकी 4 लाख 57 हजार 778 पशुधनाचे लसीकरण शनिवारी दुपारपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर, जळगाव, धरणगाव, भुसावळ या 7 तालुक्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. दररोज 15 ते 20 हजार पशूंचे लसीकरण पूर्ण करण्यात येत असून उर्वरित लसीकरण येत्या 5 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.

सध्या जिल्ह्यात 4 हजार 276 बाधित जनावरे आहेत. यापैकी 1 हजार 348 जनावरे उपचाराअंती बरी झाली आहेत. तर 2 हजार 763 पशूंवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 165 जनावरे मृत झाली आहेत.

ग्रामपातळीवर लंपीला रोखण्यासाठी ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठका घेण्यात आलेल्या असून उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत लंपीवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधी आणि लस मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com