सुनसगाव सरपंचासह ग्रामसेवकाची बिडिओंकडे तक्रार?

सुनसगाव सरपंचासह ग्रामसेवकाची बिडिओंकडे तक्रार?

सुनसगाव, Sunsagaon ता.भुसावळ । वार्ताहर

येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच (Sarpanch) व ग्रामसेवक (Gramsevak) मनमानी पद्धतीने (work in an arbitrary manner) कामे करीत असून सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी (Inquiry) करण्याची मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्यांनी (Gram Panchayat members) गटविकास अधिकार्‍यांना (Group Development Officers) दिले आहे.

भुसावळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक व सरपंच हे मनमानी कारभार करीत असून ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही. तसेच ग्रामसेवक हे आठवड्यातून दोन दिवस येतात तसेच विचारना केली असता मिटींग आहे, असे सांगतात. तसेच मासिक सभेत विश्वासात न घेता परस्पर कामे करुन उडवाउडवीची उत्तरे देतात.

याबाबत सरपंच यांना विचारणा केली असता ग्रामसेवक यांनी परस्पर कामे दिलेले आहेत, असे सांगितले जाते. ग्रामसेवक वसुलीची रक्कम बँकेत न भरता व्हाउचर लावतात. 14व्या व 15व्या वित्त आयोगाची काही कामे परस्पर करून टाकले असून वार्ड क्रमांक दोन मध्ये पाईप टाकून त्याची जास्तीची रक्कम काढण्यात आली आहे. तसेच कोणत्याही सभासदांना विश्वासात न घेता आर्थिक व्यवहार करतात, असे म्हटले आहे.

या निवेदनावर शामराव महारु मालचे, कुसूम प्रकाश मालचे, चंचल उल्हास पाटील, ज्योती युवराज पाटील, कविता अनिल सपकाळे, सुनिल परशुराम कंकरे, सुभाष राजाराम पाटील अशा सात सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.

याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी दिल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले आहे. याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेतली असता मासिक सभेतच विषय मांडून कामांना मंजुरी घेतली जाते. तसेच 14 व 15व्या वित्त आयोगाच्या कामाबाबत ग्रामसभेत मंजुरी घेतली जाते, त्यामुळे मनमानी कारभार करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच जर मनमानी केली असती तर सर्व सदस्यांनी तक्रार दाखल केला असती, असे सरपंच यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.