भुसावळ-इगतपूरी मेमू रेल्वेचे स्वागत

ड्रायव्हर, गार्ड यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार
भुसावळ-इगतपूरी मेमू रेल्वेचे स्वागत

नगरदेवळा - Nagardevala

कोरोना प्रार्दुभावमुळे गेल्या दीड दोन वर्षांपासून बंद असलेली भुसावळ- नाशिक, देवळाली, मुंबई पॅसेंजर गाडी (Bhusawal-Igatpuri Memu) भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेसच्या रुपात आज दि.१० जानेवारी २०२२ पासून सुरू करण्यात आल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून आले.

भुसावळ-इगतपूरी मेमू रेल्वेचे स्वागत
Video : आजपासून मेमू एक्स्प्रेस झाली सुरु, अलिशान गाडी, मुंबई लोकलचा फील
भुसावळ-इगतपूरी मेमू रेल्वेचे स्वागत
सोमवारपासून भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेन, पाहा थांबे अन् वेळापत्रक

नगरदेवळा येथे स्टेशन वरील प्रवासी व नागरीकांतर्फे मेमू गाडीचे स्वागत करण्यात येऊन गाडीचे ड्राइव्हर गार्ड यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मात्र रेल्वे भाडे वाढ तसेच चाकरमान्यांतर्फे वेळेविषयी नाराजीचा सूर ऐकावयास मिळत होता. त्याचप्रमाणे भाडेवाढ असो की, वेळेतील बदल प्रवासी वर्गाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर मेमू गाडी सुरू केली त्याबद्दल आभार व्यक्त करत समाधानाचे वातावरण नगरदेवळा व परीसरातील ग्रामस्थ व प्रवासी वर्गात दिसून आले.

Related Stories

No stories found.