आ. खडसेंना दिलासा; दुध संघ चोरीप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सहकारी दुध संघ (Jalgaon District Cooperative Milk Union) येथील 14 मेट्रिक टन लोणी व 9 टन दुध पावडर (Butter and milk powder) अंदाजित चोरी व अपहाराची (Theft and embezzlement) किंमत रु. एक कोटी पंधरा लाखांचा गुन्हा (crime) शहर पोलिसांनी दाखल न (No city police registered) केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी (Chief Magistrate) यांच्या न्यायालयात न्या. आर. वाय. खंडो यांनी पोलिसांना (police) याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश (Order of registration of crime) दिले असल्याची माहिती अ‍ॅड. अतुल सुर्यवंशी यांनी दिली.

जिल्हा दुध संघात झालेल्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दुध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी फिर्याद दिली होती. मात्र शहर पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी हा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. यावेळी शहर पोलिस ठाण्यासमोर आ. एकनाथराव खडसे यांनी दुध संघाचे चेअरमन मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह ठिय्या आंदोलन केले होते व पोलिसांना फिर्याद दाखल करण्याची विनंती केली होती.

मात्र पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम राहून पोलिसांनी फिर्याद घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी आरोपी अनंत अशोक आंबिकर, महेंद्र नारायण केदार व सुनिल चव्हाण यांच्याविरुद्ध जळगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात फौ.कि.अर्ज नं.843/2022 हा दि.15/10/2022 रोजी भादंवि कलम 403,406,408,420,465,468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन यांना देण्यात यावा असा अर्ज दाखल केला.

त्यावर त्याच दिवशी सुनावणी झाली व या प्रकरणात आज न्यायालयाने निकाल देत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) नुसार गुन्हा दाखल करुन नंतर चौकशी करण्याचे आदेश पारीत केला अशी माहिती अ‍ॅड. अतुल सुर्यवंशी यांनी दिली.

पोलिसांसह राजकारण्यांना चपराक - आ. खडसे

न्यायालयाने दुध संघातील चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन पोलीस प्रशासनासह राजकारण्यांना सणसणीत चपराक लगावली आहे. किमान आता तरी पोलीस प्रशासन दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल करून निष्पक्षपातीपणे चौकशी करतील आणि तथ्य समोर आणतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.

दूध संघाप्रकणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे कायदेशीर अवलोकन केले जाईल. त्यानंतरच याप्रकरणी उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.

डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक, जळगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com