
वरणगाव, Varangaon ता.भुसावळ । वार्ताहर
तालुक्यातील दीपनगर औष्णीक विद्युत (Deepnagar Thermal Power Plant) प्रकल्पात कोळशापासुन विद्युत निर्मिती केली जाते. त्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून वाहतुक होवुन या औष्णीक केंद्राला कोळशा पुरवला जातो. मात्र सदर कोळसा वाहतुक करणारी मालगाडी फुलगाव जवळ येताच या ठिकाणी फुलगावसह परीसरातील सराईत कोळसा चोर चालत्या मालगाडीवर चढून गेल्या कित्येक वर्षापासुन कोळसा चोरीचा (Coal theft) प्रकार सुरू आहे. या चोराचा शोध घेवुन अखेर वरणगाव पालिसांनी दि.10 रोजी पहाटे 3.30 वाजेदरम्यान जोगेश्वरी मंदीरात लपून बसलेल्या तीन हि फरार संशयीतांना अटक (arrested) केली आहे.
दीपनगर औष्णीक विद्युत प्रकल्पात दररोज शेकडो टन कोळशाची मागणी असल्याने गेली कित्येक वर्षापासुन दररोज वरणगाव, फुलगावमार्गे रेल्वेने कोळसा आणला जात आहे. मात्र फुलगावसह परीसरातील काही चोरट्यांनी रेल्वेने येणारा कोळसा चोरण्यासाठी 30 ते 40 लोकांची टोळी तयार केल्याची चर्चा आहे. या टोळीतील सर्व सराईत गुन्हेगार असुन यांच्यावर रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा विभागात विविध गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. हि मंडळी गुन्हेगारी क्षेत्रात प्रख्यात असल्याने ते कोणाला मारायला व स्वतः मरायला सुध्दा घाबरत नाही. त्यामुळे दीपनगर प्रशासनाची कडक सुरक्षा असतांना देखील बिनधास्तपणे रेल्वेच्या मालगाडीवर चढून कोळशाची दिवसाढवळ्या चोरी करत असून त्यांना ना आरपीएफची, ना पोलिस किंवा दीपनगरच्या सुरक्षा विभागाची भिती, त्यांची चोरीची शैली देखील कोणाला हि पाहून आश्चर्य वाटेल.
प्रकल्पाच्या 200-300 पावलांच्या अंतरावर या टोळ्यांमधील चोरटे चालत्या ट्रेनमधून कोळसा चोरण्यात पटाईत असुन दीपनगर प्रशासनाच्या सुरक्षा विभागातील सुरक्षा रक्षकांचा चोरटयांवर कडक पाहरा आहे. परंतु तरीही चोर्या होतातच कशा? अशाच प्रकारच्या चोरीची गुप्त माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांनी पोलीसांचे पथक तयार करून फुलगाव जवळील सदगुरु बैठक हॉलजवळ दि.5 मार्च रोजी दबा धरून बसले असता दुपारी 2 वाजता दीपनगरकडून येणारे एका निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसांना पाहुन दुसर्या मार्गाने ट्रॅक्टर वळवून पळ काढला. ट्रॅक्टरमध्ये रेल्वे वॅगन मधील चोरलेला कोळसा भरून पळून जात असलेल्या बापू बाविस्कर व जितू चंद्रकांत पाटील दोन्ही रा.फुलगाव व एक अज्ञात यांना पोलिसांनी ओळखल्याने त्यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसात या प्रकरणी औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा अधिकारी राजेश हरी तळेले यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पीएसआय इस्माईल शेख करीत आहे.
परंतु आरोपी चोर ट्रॅक्टरसह 10 क्विंटल कोळसा घेऊन पोलिसांना चकवा देवुन ट्रॅक्टरसह पसार होण्यात यशस्वी झाले होते. दि.10 रोजी पहाटे 3.30 वाजेदरम्यान पोलिस अधिकारी आडसूळ यांना पुन्हा गुप्त माहितीच्या आधारे कोळसा चोरीतील तीनही संशयीत फुलगाव येथील जोगेश्वरी मंदीरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ, हेकाँ नावेद अली सादेक अली, हेकॉ योगेश पाटील, प्रमोद कंखरे यांनी संशयीत सागर महेंद्र भालेराव (वय 29), एकनाथ उर्फ जितू चंद्रकांत पटील (वय 30), प्रविण उर्फ बापू भास्कर बाविस्कर (वय 45) सर्व रा.फुलगाव यांना अटक केली असुन त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यात वापर केलेले 10 क्विंटल कोळशासह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली.
सदर गुन्हेगार किती दिवसांपासुन कोळसा चोरी करीत आहे. कुणच्या आशिर्वादाने चोरी करीत आहे. आणखी किती लोकांची टोळी कार्यरत आहे. चोरी केलेला कोळसा कुठे आणि कोणाला विकत होते अशी त्यांच्याकडून माहीती घेतल्यास मोठ मोठे अधिकारी व पुढार्यांचे या कोळसा चोरी प्रकरणात नाव पुढे येवु शकते, अशी चर्चा परीसरात सुरु आहे.