दीपनगर केंद्राला कोळसा टंचाईचा फटका, एक संच कार्यरत

दीपनगर केंद्राला कोळसा टंचाईचा फटका, एक संच कार्यरत
दीपनगर

फेकरी,Fekri ता. भुसावळ । वार्ताहर

कोळशाच्या टंचाईमुळे (Coal scarcity) दीपनगर (Deepanagar)प्रकल्पातील 500 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच प्रशासनाला बंद (bandh) करण्याची नामुष्की ओढावली आहे सध्या केवळ संच क्रमांक चार हा एकमेव संच कार्यरत आहे राज्याची विजेची मागणी 20 हजार मेगावॅट पेक्षा अधिक असताना कोळसा टंचाईमुळे संच बंद (शटडाऊन) करण्यात आल्याने आपात्कालीन भारनियम (load shedding) वाढण्याची भीती आहे.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राला दर दिवसाला तिन्ही संच कार्यरत ठेवण्यासाठी सुमारे 21 हजार मेट्रिक टन एवढ्या कोळशाची आवश्यकता असते मात्र पाचव्या क्रमांकाचा संच बंद झाल्याने बुधवारी दीपनगर केंद्रात 732 मेट्रिक टन इतकाच कोळसा शिल्लक होता. यामुळे बुधवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान दीपनगर प्रशासनाने वीजनिर्मिती करणारा संच क्रमांक पाच हा बंद करण्याचा निर्णय घेतला दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र 500 मेगावॅट स्थापित क्षमतेचे दोन संच कार्यरत असून 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन ही वर्षभरापासून कोळशाच्या अभावी बंदच आहे 1210 मेगावॅट स्थापित क्षमतेच्या तुलनेत किमान 988 मेगावॅट वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे. मात्र कोळशाच्या टंचाईमुळे संच क्रमांक पाच बंद करण्यात आल्याने सध्या केवळ संच क्र. चार मधून 500 वीज निर्मिती सुरू असून येत्या पाच- सहा दिवसांमध्ये कोळसा उपलब्ध न झाल्यास चौथ्या क्रमांकाचा संचही बंद होण्याची शक्यता आहे यामुळे दीप नगरातील वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प होऊ शकते

Related Stories

No stories found.