‘केळी’वर सी.एम.व्ही.चा प्रादुर्भाव

‘केळी’वर सी.एम.व्ही.चा प्रादुर्भाव

मस्कावद Maskavad ता. रावेर । वार्ताहर

मस्कावदसह (Maskavad) परिसरात नवीन केळी पिकांवर (new banana crops) सी एम व्ही (CM V) अर्थात कुकुंबर मोइॅक (Cucumber Moiac) या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव (Viral disease) झाल्याने नवीन लागवडीखाली असलेली केळीचे पाने पोगे (Poge the banana leaves) यावर या बुरशी (fungus) दिसून येत असल्याने खराब होत आहेत. परिणामी या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

रावेर तालुक्यातील सावदा मंडळ हा विभाग केळी उत्पादनाच्याबाबतीत आघाडीवर आहे. सी.एम.व्ही अर्थात कुकुंबर मोसॅक व्हायरस या रोगाला स्थानिक भाषेत हरण्या रोग म्हणतात. गेल्या तीन वर्षांत या रोगाचा मोठ्या प्रसार होत असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने रावेर तालुक्यातील सावदा मंडळात मस्कावद सह आंदलवाडी, दसनूर. वाघोदा इत्यादी भागात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

या रोगास कारणीभूत घटक

सतत ढगाळ वातावरणे, जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडीत पाऊस, हवेचे कमी तापमान, वाढलेली आर्द्रता हे घटक रोगास अतिशय पोषक असतात. या रोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत ओळखून त्यावर नियंत्रण करणे अत्यंत महत्वाचे आहे. या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो. तर रोगाचा दुय्यम प्रसार मावा या किडीमार्फत होतो. या परिसरात दरवर्षी एक पीक घेतल्यानंतर दुसरे पीक त्वरीत घेतले जाते. त्यात किमान दोन ते तीन महिन्यांचा विश्रांती कालावधी नसल्याने तसेच पिकांची फेरफलट नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून जून महिन्यात लागलेल्या नवीन केळी केळी लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यात या रोगाची लक्षणे दिसत आहे. सुरुवातीस कोवळया पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळून येतात. एका पानावर अर्धा पट्टे किंवा पूर्ण पानभर पसरलेले असतात. कालांतराने पानाचा पृष्ठभाग आकसला जातो. त्यांच्या कडा वाकड्या होऊन पानांचा आकार लहान होतो. नविन येणारे पाने आकाराने लहान होतात. पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. पान हाताने दाबल्यास कडकड असा आवाज होतो. पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील ऊती मरतात व पाने फाटतात. नविन येणारे पाने आकाराने लहान होतात. रोगाच्या अतितीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडतो. अशी झाडे पक्व अवस्थेपर्यंत टिकाव धरत नाहीत. झाडाची वाढ खुंटते, अशा झाडांची निसवण उशीरा, अनियमित होऊन फण्या अत्यंत लहान होतात व फळे विचित्र आकाराची होतात. त्यावर पिवळ्या किंवा काळ्या रंगाच्या रेषा दिसतात. विक्रीसाठी अशा फळांचा काहीच उपयोग होत नाही. तापमान व पाऊस पाणी यातील बदलामुळे काहीवेळा हि लक्षणे नाहीशी होऊ शकतात.एकदा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावरील नियंत्रणासाठी त्यावर कोणताही ठोस उपाय करता येत नाही. तथापि, त्याचा पुढील प्रसार रोखण्यासाठी काही बाबी लक्षात घ्याव्यात.

शेतातील प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून, दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावी. दर 4/5 दिवसांनी बागेचे पुन्हा निरीक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही वरील प्रमाणे विल्हेवाट लावावी. बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी. केळीत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका या पिकांची लागवड करु नये. बागेभोवती रान कारली, शेंदणी, कटूर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडाचे वेल नष्ट करावेत. मावा या वाहन किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट 30 ई.सी 20 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु, जी. 2 ग्रॅम किंव इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल 5 मिली या किटकनाकांची 10 ली. पाण्यामध्ये मिसळून बाग पूर्णपणे स्वच्छ करुन फवारणी करावी. गाव पातळीवर एकत्रितरित्या नियंत्रणासाठी स्वतंत्र मोहिम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रयोगाअंती असे दिसून आलेले आहे की, फलोनिकामाइड 7 ग्रॅम + 15 लिटर पाणी यांची फवारणी केली तर मावा किडीचे नियंत्रण करु शकतो.विषाणूजन्य रोगाचे प्रमाण दरवर्षी वाढत असून केळी उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करणे व केळी पिकावरील विषांणूजन्य रोगांचे नियंत्रण करुन नुकसान टाळणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com