केळी पीकविम्याचे निकष बदलवता येणार नाही पण...

या वर्षासाठी होणाऱ्या नुकसानीचा मोबदला राज्यसरकार देणार; आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून संपन्न झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  निवेदन देतांना आमदार शिरीष चौधरी यावेळी उपस्थित मंत्री गुलाबराव पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देतांना आमदार शिरीष चौधरी यावेळी उपस्थित मंत्री गुलाबराव पाटील

रावेर - Raver - प्रतिनिधी :

केळी पिक विम्याचे निकष यावर्षी बदलवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून दरवाजे बंद झाल्याने,

राज्य सरकार याबाबत सकारात्मकरित्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोबदला देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

मंगळवारी,मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर केळी पिक विम्याचे निकष बदलवण्यासाठी रावेर व मुक्ताईनगर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी पार पाडली.

कृषी मंत्री दादा भुसे,जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील,पाचोरा आमदार किशोर पाटील,प्रधान सचिव,कृषी सचिव एकनाथ डवले,मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केळी पिक विम्याचे निकष बदलवण्यासंदर्भात आता केंद्र सरकारकडून नकार मिळाल्याने आता राज्य सरकार विमा कंपनीशी बोलून याबाबत निर्णय घेणार आहे.

निकष बदलवण्याबाबत निर्णय न झाल्यास यंदा होणार्या नुकसानीला सरकार मदत करणार असल्याचे देखील सुतोवाच मुख्यमंत्री यांनी दिले.

तसेच वारंवार होणार्या नुकसानीबाबत कायमचा उपाय म्हणून काय करता येईल याबाबत या क्षेत्रातील संशोधक व शेतकरी यांच्याशी चर्चा करून उपाय ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार चौधरी यांनी निकष बदलवण्याचा आग्रह धरल्याने याबाबत गांभीर्य लक्षात घेवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतली.

यावेळी रावेर बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,डी सी पाटील,पितांबर पाटील,नीलकंठ चौधरी,माजी जिप सदस्य विनोद तराळ,रमेश पाटील,बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे,भागवत पाटील,विकास महाजन,सुनील कोंडे,व शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com