मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा

मंगेश चव्हाण
मंगेश चव्हाण

जळगाव - jalgaon

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजपा (bjp) आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी खडसेंविरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र याविरोधात एकनाथ खडसे (mla Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

मंगेश चव्हाण
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

याचिका फेटाळण्यात आल्यानं आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या विरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांना मुक्ताईनगरमधून निवडणूक लढवता येणार नाही असा दावा एकनाथ खडसेंनी केला . त्यानंतर याविरोधात मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान खडसेंचा हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. खडसेंचा दावा फेटाळण्यात आल्यानं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

मंगेश चव्हाण
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com