‘अ’ वर्ग भुसावळ पालिकेत ‘क’ दर्जाचा कारभार

परिवर्तन मंचाचा घणाघात : न्यायालयात जाण्याचा ईशारा
‘अ’ वर्ग भुसावळ पालिकेत ‘क’ दर्जाचा कारभार

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

येथील पालिका (Bhusawal Municipality) नावाला ‘अ’ वर्ग पालिका आहे. प्रत्यक्षात मात्र या पालिकेचा कारभार (management) ‘ब’ किंवा ‘क’ दर्जापेक्षाही खराब आहे. असा घणाघात भुसावळ परिवर्तन मंचातर्फे (Bhusawal Parivartan Manch) प्रा. जयेंद्र लेकुरवाळे (Prof. Jayendra Lekurwale) यांनी केला आहे.

ते 19 रोजी येथील शासकीय विश्रमागृहात आयोजित पत्रकार परिषदेत (press conference) बोलत होते. यावेळी डॉ. विरेंद्र झांबरे, अ‍ॅड. मनिष सेवलाणी, अ‍ॅड. दिनेश चव्हाण, मंगेश भावे, प्रवीण शर्मा, अ‍ॅड. जास्वंदी भंडारी, नरविरसिंह रावळ आदी उपस्थित होते.

यावेळी शहरातील विकास कामांबद्दल (Development work) बोलतांना प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे म्हणाले की, शहरात होत असलेली विविध विकास कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहे. रस्त्यांचा विषय यात गंभीर असून नगररचना विभागाच्या (Town Planning Department) नकाशानुसार दिसणारे रस्ते हे प्रत्यक्षात लांबी , रुंदीच्या बाबतीत निम्म्याहुनही कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याच नकाशानुसार रस्त्यांच्या कामांची निविदा (Tender) काढण्यात येवून सदरची बीले पास करण्यात येत आहे. प्रत्यक्षात हे रस्ते मात्र कमी रुंदीचे आहे. यामुळे शहरातील अतिक्रमणाला (Encroachment) ही वाव मिळाला आहे.

यासह निविदा (Tender) प्रक्रिया ही मोघम स्वरुपाची प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे ठराविक मक्तेदारांनाच कामे मिळते. निविदेतील मजकुरात तफावत निर्माण केली जात आह. योग्य कामाचा व आकाराचा स्पष्ट उल्लेख निविदेत नसल्यामुळे ई टेंडरींग करुनही चांगले ठेकेदार शहरातील कामे घेण्यात पुढे धजावत नाही.त्यामुळे शहात चांगल्या कामांचा वणवा आहे.

उद्यानातील साहित्य खरेदीत घोळ

येथील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात (Shamaprasad Mukherjee Park) लावण्यात आलेली साहित्याच्यां खर्चातही दुपटीची तफावत आहे. कमी दर्जाचे साहित्यांचा खर्च उत्कृष्ट साहित्यांच्या खर्चात साहित्यांची खरेदी करण्यात आली आहे.

अभ्यासिकांना धुळ खात पडून

शहरात पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी (study) अभ्यासिका तयार करण्यात आल्या आहे. मात्र सध्या या अभ्यासिका अन्य लोकांच्या ताब्यात आहे तर काही धुळखात पडून आहे. त्यांचे उद्दीष्ट सफल होत नाही. अशा अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी (students) खुल्या करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

...तर उच्च न्यायालयात याचिका

नुकत्याच झालेल्या रस्त्यांचे कामे निकृष्ठ आहे. काही दिवसात या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ठेकेदाराने या रस्त्यांची देखरेख करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी 7 दिवसात दुरुस्ती न झाल्यास उच्च न्यायालायात (High Court) याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा ईशारा त्यांनी केला.

कोअर कमेटी

भुसावळ परिवर्तन मंचाची कोअर कमेटी तयार करण्यात आली आहे. यात प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. विरेंद्र झांबरे, अ‍ॅड. मनिष सेवलाणी, अ‍ॅड. दिनेश चव्हाण, मंगेश भावे, प्रवीण शर्मा, अ‍ॅड. जास्वंदी भंडारी, नरविरसिंह रावळ, डॉ. राजेश मानवतकर, प्रा. प्रवीण फालक, दिलीप जोववाल यांचा समावेश करण्यात आला असल्याचे प्रा. लेकुरवाळे यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com