भडगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी

42 जणांविरुद्ध गून्हे दाखल
भडगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी

भडगांव Bhadgaon प्रतिनिधी

शहरातील खालची पेठ भागात ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटाव्हेंटरचा (Rotaventer shock attached to tractor) धक्का लागण्याच्या कारणावरून दि.14 रोजीच्या रात्री 9  वाजेच्या दरम्यान दोन्ही गटाच्या लोकांनी (Both groups of people) लाठया काठ्या लोखंडी रॉड कोयत्या सह दगडफेक (Throwing stones) करीत दोन गटात तुफान हाणामारी (fight) झाल्याची घटना घडली असून यात दोन्ही गटाचे 7 ते 8 जण जखमी (wounded) झाले आहे.याबाबत भडगांव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे (Opposing crimes filed) दाखल करण्यात आले आहे.

भडगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी
Political Big News : आठवड्याभरात जळगाव शहर महापालिकेच्या राजकारणात होणार मोठा धमाका....

एका गटाच्या 19 संशयित आरोपींवर  तर दुसऱ्यात  दुसऱ्या गटाच्या 23 संशयित आरोपींवर परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील खालची पेठ भागात दि.14 रोजीच्या रात्री 9ते 9:30 वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटाव्हेंटरचा धक्का लागल्याच्या कारणा वरून एका गटाने भडगांव पोलिसात आज दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, खालची पेठ येथील सार्वजनिक जागी यातील आरोपी यांनी संगनमतकरून गैरकायद्याची मंडळी जमवुन यातील आरोपी नं. 1 याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या हाताचे मनगटावर मारले व फिर्यादी ची पत्नी सकुबाई भिमराव मालचे व मुलगा दत्तात्रय भिमराव मालचे चुलत भाऊ प्रविण सुरेश मालचे यांना कंबरेवर लाठी काठ्यांनी मारहाण केली.

तसेच फिर्यादी ची पत्नी सकुबाई हिला दादा देवरे यांनी शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणुन फिर्यादी भिमराव गुलाब मालचे यांच्या फिर्यादीवरून भडगांव पोलिस स्टेशनला  गु. र. नं. 98/2023 भा.द.वी कलम 324,325,323,143, 147, 148, 149 अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदया अन्वये तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) 3 चे उल्लंघन 135 प्रमाणे 19 संशयित आरोपी रा. खालची पेठ, भडगांव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीला नावलौकिक मिळवुन देण्यासाठी एकहाती सत्ता द्या
भडगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी
रावेर कृषी बाजार समिती निवडणूक : भाजपाचे उमेदवार ठरले केवळ घोषणा बाकी

याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगांव भाग चाळीसगांव हे करीत आहे.तर दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की,खालची पेठ भडगांव येथील सार्वजनिक जागी यातील आरोपी यांनी संगनमत करून गैर कायद्याची मंडळी जमवुन यातील साक्षीदार याचे ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटाव्हेटरचा धक्का दादाभाऊ आबा सोनवणे उर्फ (धुम आबा) याच्या गाडीला लागला. या कारणावरून साक्षीदार यास मारहाण केली होती. या कारणावरून आरोपी यांनी आमच्या नांदी लागतात का ? तुमचा आज एकेकाचा काटा काढून तुम्हाला जिवंतच ठेवायचे नाही असे बोलत होते.

भडगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी
एक एकर जमीन अन् 185 क्विंटल हळद..... वाचाच चिंचोलीच्या पितापुत्रांची सक्सेस स्टोरी

त्यावेळी फिर्यादी व ईतर लोक त्यांना समजाविण्यास गेले असता आकाश संजय मोरे याने त्याचे हातातील लोखंडी रॉड मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच सदरचा रॉड त्याने फिर्यादीचे डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केल्ला. तसेच साक्षीदार विजय भरत पवार याच्या डोक्यावर भगवान युवराज गायकवाड याने लोखंडी रोड मारून दुखापत केली.

तसेच साक्षीदार विजय भरत पवार याच्या डोक्यावर भगवान युवराज गायकवाड याने लोखंडी रोड मारून दुखापत केली म्हणून फिर्यादी निलेश भरत पवार याच्या फिर्यादीवरून भडगांव पोलिस स्टेशनला गु. र. न  97/2023 अन्वये भा.द.वी कलम 307,143,147,148, 149,323,324,504,506 महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) 3 चे उल्लंघन 135 प्रमाणे 38 संशयित आरोपी सर्व रा. खालची पेठ भडगांव याच्या विरोधात भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे. पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला असुन परिसरात तणाव पुर्ण शांतता आहे.

भडगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी
का म्हणाली असेल बर अभिनेत्री सायली सजीव : त्याच दुसर्‍या कोणाशी आणि माझ दुसर्‍या कोणाशी लग्न होईल तेव्हाच...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com