कुलगुरु डॉ.माहेश्वरी यांचा आज नागरी सत्कार

कुलगुरु डॉ.माहेश्वरी यांचा आज नागरी सत्कार

जळगाव । प्रतिनिधी

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) कुलगुरूपदी प्रा.डॉ.विजयकुमार माहेश्वरी (Vice Chancellor Prof. Dr. Vijay Kumar Maheshwari) यांची निवड झाल्याबद्दल जळगाव,धुळे नंदुरबार या खान्देशातील जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे (District Maheshwari Samaj) कुलगुरू डॉ.माहेश्वरी यांचा नागरी सत्काराचा (Civil felicitation) कार्यक्रम दि.3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, महाबळरोड, जळगाव येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी (National President Shyamsunder Soni), महेश आवास योजना समितीचे प्रमुख अशोक बंग, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिसन भन्साली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

तसेच राष्ट्रीय संयुक्त मंत्री सुरेंद्र मानुधने, प्रदेश मंत्री मदनलाल मिनियार, महाराष्ट्र महेश सेवा निधीचे कार्याध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, प्रदेश संयुक्त मंत्री विठ्ठलदास आसावा, प्रदेश माहेश्वरी युवक संघटन अध्यक्ष हार्दिक सारडा हे उपस्थित राहतील. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष (Chairman of Jalgaon District Maheshwari Sabha) अ‍ॅड. नारायण लाठी (Adv. Narayan Lathi), सचिव माणकचंद झवर यांनी केले.

Related Stories

No stories found.