पोलिसांच्या जनता दरबाराकडे नागरिकांनी फिरविली पाठ

पोलिसांच्या जनता दरबाराकडे नागरिकांनी फिरविली पाठ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पोलिसात दाखल (Filed with police)असलेल्या तक्रारी निकाली (Complaint removed) काढण्यासाठी पोलिस विभागाकडून (Police Department) जनता दरबार (Janata Darbar) घेण्यात आला. परंतु पहिल्याच जनता दरबाराला शहरातून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने (No response received) नागरिकांनी (citizens) याकडे पाठ फिरविल्याचे (Turned back) दिसून आले. दरम्यान, पहिल्याच पोलीस दरबारात केवळ 40 ते 50 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यात सर्वाधिक तक्रारी या दिवाणी प्रकरणांच्या असल्याने त्यांना न्यायालयात (court) दाद मागण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी (Superintendent of Police) दिल्या.

पोलिसात दाखल झालेल्या तक्रारी अर्जांचा निपटारा होत नसल्याने तक्रादाराला न्याय मिळत नाही. यामुळे अशा तक्रारी तात्काळ निकाली काढण्यासाठी असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जनता दरबारचे आयोजन करण्याच्या सूचना देखील वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आल्या आहे.

त्यानुसार पोलीस विभागातील जळगाव शहर, जिल्हापेठ, शनीपेठ, एमआयडीसी, रामानंद नगर पोलीस ठाणे आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे शनिवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, रामानंद नगरचे निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह इतर प्रभारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. सर्व पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जांचे यावेळी निराकरण करण्यात आले.

प्रकरणे जागेवर निकाली काढण्याच्या सूचना

पोलीस जनता दरबारात आलेल्या तक्रारदारांचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच त्यांची प्रकरणे जागेवरच निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या होत्या. तसेच जे काही प्रकरणे पोलिसांशी संबंधित नाही. असे दिवाणी प्रकरणे दाखल केलेल्यांना न्यायालयात दाद मागण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी पोलीस दरबाराशी निगडीतच तक्रारी कराव्या,असेही त्यांनी सांगितले.

जनजागृतीचा अभाव

पोलीस दलाकडून पहिल्यांदाच जनता दरबार घेण्यात आला. त्यामुळे शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात तक्रारी येवू शकतात असा पोलिसांचा अंदाज होता. परंतु जनता दरबाराविषयी जनजागृती न केल्यामुळे दिवसभरात केवळ 40 ते 50 तक्रारीच प्राप्त झाल्या होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com