शिवाजीनगरातील नागरिकांचे आंदोलन रस्त्यांसाठी जनआक्रोश

शिवाजीनगरातील नागरिकांचे आंदोलन रस्त्यांसाठी जनआक्रोश

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर (Chhatrapati Shivaji Maharaj Nagar) ते दूध फेडरेशन परिसरातील मुख्य रस्त्यासह (main road) परिसरातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था (Very bad condition of the road) झाली आहे. वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करुन देखील रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे शिवाजीनगरातील (Shivajinagar) संतप्त नागरिकांनी इंद्रप्रस्थ नगर येथून मोर्चा (morcha) काढून एस. के . ऑईल मिल जवळील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले. दरम्यान, महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले.

छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरात रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागिरकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, शहर पोलीस पथक दाखल झाले . त्यानंतर महापौर जयश्री महाजन आंदोलनस्थळी दाखल होत आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.

आंदेलनात माजी नगरसेवक राजू मोरे, आकाश जाधव, विजय सुरवाडे, संदीप महाले, दीपक झुझारराव, नितीन मोरे, अतुल शिरसाळे, स्वामी पोतदार, महेश ठाकूर, अमर लोखंडे, नारायण कोळी, कुमार निकम, बंटी सोनवणे, भूषण राऊत , लक्ष्मीकांत तिवारी, चंद्रमणी मोरे आदी उपस्थित होते.

महापौरांसमोर वाचला समस्यांचा पाढा

बर्‍याच दिवसापासून संथ गतीने काम असलेल्या शिवाजीनगर उड्डाण पुलासंदर्भांत नागरिकांनी महापौर महाजन यांना विचारले असता महापौर यांनी लागलीच ठेकेदाराला फोन करून हे काम लागलीच सुरु करण्याची विनंती केली.आंदेलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर महापौरांनी प्रभागातील संपूर्ण भागाची पाहणी केली.दरम्यान,पाहणी करीत असताना के.सी पार्क परिसरातील नागरिकांनी देखील महापौरां समोर समस्यांचा पाढा वाचला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com