चोसाका आमच्या बापाचा!

आधी कार्यक्षेत्रातील ऊस तोडा; बारामती अ‍ॅग्रोकडे मागणी : बाहेरील ऊस रोखण्याचा शेतकर्‍यांचा इशारा
चोसाका आमच्या बापाचा!

चोपडा / घोडगाव Chopda / Ghodgaon। प्रतिनिधी / वार्ताहर

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना (Chopda Farmers Cooperative Sugar Factory) आर्थिक अडचणीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद होता. त्यामुळे साखर कारखाना बारामती ऍग्रो कंपनीला (Baramati Agro Company) भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामती ऍग्रोला भाडेतत्वावर देऊन चार महिने झाले त्यानंतर पहिला गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना झाला. चोसाका कार्यक्षेत्रात जवळपास सव्वालाख टन ऊस (sugar cane) उभा असून, तोडणीवर आहे. येथील शेतकर्‍यांचा ऊस न तोडता बारामती ऍग्रो गाळपासाठी बाहेरील जिल्ह्यातून गाड्या भरून ऊस आणत आहेत. दुसरीकडे मुक्ताईनगर साखर कारखाना चोपडा तालुक्यातून ऊस घेऊन जात आहेत. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना भाव कमी मिळत आहे. म्हणून बारामती ऍग्रोने गाळपासाठी स्थानिक शेतकर्‍यांना प्राधान्य (Preference to local farmers) देऊन तोडणीवर आलेल्या उसाची तोडणी करावी.त्यासाठी चोसाका संचालक मंडळाने (Board of Directors) पुढाकार घ्यावा, अशी मागणी गरताड येथील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी प्रभारी कार्यकारी संचालक अकबर शफी पिंजारी (Akbar Shafi Pinjari, Executive Director in charge) यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बारामती ऍग्रो कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यातील ऊसाची रिकव्हरी सुध्दा काढली मग ऊस तोडणी सुरू करायला एव्हढा उशीर का लावला जात आहे? ठराविक एक ते दोन ठिकाणी हार्वेस्टर मशिनद्वारे ऊस तोडणी सुरू झाली आहे ,मग इतर गावातील शेतकर्‍यांचे काय? चोपडा तालुका कार्यक्षेत्रात भरपूर प्रमाणात ऊस उभा असतांना बारामती ऍग्रो गाळपासाठी बाहेरील जिल्ह्यातून गाड्या भरून ऊस आणत आहेत.साखर कारखाना भाडेतत्त्वावर देतांना कार्यक्षेत्राचा काही विचार झालेला आहे की नाही? असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. गरताड शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस असून ऊस तोडणी लवकरच सुरू होणार आहे, असे बारामती ऍग्रोकडून वारंवार सांगितले जाते. मात्र ऊस तोडणीसाठी मजूर येत नाहीत. हक्काचा कारखाना सोडून नाईलाजाने मुक्ताईनगर कारखान्याला ऊस द्यावा लागत आहे.उसाची तोडणी पंधरा दिवसात झाली नाही तर उस पोकळ होऊन वजन घटेल. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

प्रत्यक्षात मात्र दुसरी कडुन ट्रकचा ट्रक ऊस येत आहे, या बाबत तातडीने एवढ्या आठ दिवसांत तालुक्यात व गरताड शिवारातील शेतकर्‍यांचा ऊस तोडणी सुरू झाली नाही तर मात्र संयम सुटेल आम्ही कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस आमच्या हक्काचा कारखान्यात येवू देणार नाही. वेळ प्रसंगी रस्ता-रोको आंदोलन मोर्चा उपोषण सुरू करु, कारखाना बंद झाला तरी चालेल.कारण हा कारखाना आमच्या बापाचा आहे, आमचा आधि विचार झालाच पाहिजे, म्हणून बारामती ऍग्रोने लवकर निर्णय घेऊन कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी करावी अन्यथा बाहेरचा ऊस चोसाकाला येऊ देणार नाहीत, असा इशारा गरताड येथील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर विश्वनाथ माणकू पाटील, नथू दलपत पाटील,प्रभाकर गोपीचंद पाटील, जितेंद्र जगन्नाथ पाटील,गुलाब शिवराम पाटील, प्रदीप दिलीप पाटील, समाधान मधुकर पाटील,प्रमोद संतोष पाटील, अजय मंगल पाटील, कैलास नामदेव पाटील, राहुल तुकाराम पाटील, प्रविण रूपसिंग पाटील, दीपक हिंमतराव पाटील, राहुल नवल पाटील, सुमित रामलाल पाटील (सर्व रा. गरताड) यांच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com