
जळगाव - प्रतिनिधी
जुन्या जळगावातील चौधरीवाडा चौकात विशाल कैलास सोनवणे (वय 28, रा.आंबेडकरनगर) या तरुणावर गुरुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास 4 ते 5 अनोळखी तरुणांनी मारहाण करुन त्याच्यावर चॉपरने वार केले.
यात तो गंभीर जखमी झाला. त्यास मानेवर, कपाळावर, हातावर चापरने वार करून जबर जखमी केले आहे. याबाबत शनिपेठ पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणास डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. या हल्ल्याचे कारण आणि हल्ला करणार-या तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.