लग्न मोडल्याच्या रागातून तरुणावर चॉपर हल्ला

शिवाजी नगर उड्डाणपुलाजवळील घटना; एक संशयिताला अटक
लग्न मोडल्याच्या रागातून तरुणावर चॉपर हल्ला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

लग्न मोडल्याच्या (marriage breakup) कारणावरून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ विक्की सांडू यादव रा. ब्राह्मणसभा या तरुणावर (young man) चॉपर हल्ला (Chopper attack) करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी सोमवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवेक मराठे याला अटक करण्यात आली आहे. संशयिताला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेजवळील विवेक किशोर मराठे याचा नातेवाईक गोलू मराठे याचे प्रेमसंबंध असलेल्या तरुणीशी विक्की यादव या तरुणाचा साखरपुडा ठरला होता. परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विक्कीला तरुणीसोबतचे फोटो टाकल्यानंतर त्यांनी हा साखरपुडा मोडून टाकला. त्याचा राग मनात ठेवून विवेक मराठे याने रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास विक्कीला छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ बोलाविले आणि त्याच्यासोबत वाद घातला.

त्यांतील वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विवेक मराठे याने विक्कीच्या पोटात चॉपर खुपसला. यात विक्की हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सोमवारी 3 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता दिपक गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विवेक किशोर मराठे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर शहर पोलीसांनी विवेक मराठे याला अटक केली होती.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे. संशयिताला आज न्यायालया हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com