चोपडा रोटरी क्लबला 10 पुरस्कार प्राप्त

चोपडा रोटरी क्लबला 10 पुरस्कार प्राप्त

चोपडा hopda । प्रतिनिधी-

येथील रोटरी क्लबने (Rotary Club) सन-2021-22 या काळात तब्बल 62 उपक्रम/विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवून दमदार कामगिरी (Strong performance) केली आहे.रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेतर्फे मिळणार्‍या विविध श्रेणीतील 13 पुरस्कारांसाठी (For 13 awards in various categories) तत्कालीन अध्यक्ष पंकज बोरोले यांनी नामांकन दाखल (Nomination filed) केले होते. 13 पैकी तब्बल 10 वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कारांनी चोपडा रोटरी क्लबने सन 2021-22 मधील तत्कालीन अध्यक्ष पंकज बोरोले यांना सन्मानीत (honor) करण्यात आले आहे. यावेळी बोरोले यांच्या समवेत प्रविण मिस्त्री,भालचंद्र पवार उपस्थित होते.

विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त पुरस्कार मिळविणारा चोपडा रोटरी क्लब असून तब्बल 10 वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कारांनी पंकज बोरोले यांना सन्मानीत करण्यात आले आहे. त्यात युवकांसाठी उत्कृष्ट सेवा, उत्कृष्ट उद्योजकता विकास, समाजसेवेसाठी सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट कुटुंब कल्याण कार्य, नैसर्गिक आपत्तीत उत्कृष्ट कार्य, सर्वोत्तम रेनवॉटर हार्वेस्टिंग, आदिवासींसाठी कार्य, जनसंपर्क, महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी, रोटाकिड्स रोटरी प्रांतपालां चा विशेष कौतुक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे गव्हर्नर डॉ.आनंद झूनझुनवाला यांच्याहस्ते तर माजी गव्हर्नर रमेश मेहेर, शब्बीर शाकीर, राजे संग्रामसिंग भोसले, राजीव शर्मा, डॉ.राजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरीचे तात्कालीन अध्यक्ष पंकज बोरोले व पदाधिकारी प्रविण मिस्त्री व भालचंद्र पवार यांना प्रदान करण्यात आले.

गतवर्षी रोटरी क्लबने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध प्रकारचे 62 उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com