चोपडा : चहार्डी येथे तीस हजारांचा गुटखा जप्त

पोलीस निरीक्षकांची कारवाई
चोपडा : चहार्डी येथे तीस हजारांचा गुटखा जप्त

चोपडा - Chopda - प्रतिनिधी :

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी चहार्डी येथील झाडण चौकात व चोपडा शहरात

आरोपीच्या राहत्या घरी अचानक धाड टाकून तीस हजार रुपयांचा अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त करण्यात आल्याची कारवाई शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाई मुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खडबळ उडाली होती.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व पोलिसांनी चहार्डी येथील झाडण चौकातील स्वतंत्र्य शिखरचंद जैन यांच्या सागर प्रोव्हीजन व त्याच्या चोपडा शहरातील धनगर गल्लीतील राहत्या घरी आज दि.६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकून राज्यात बंदी असलेला २८,८७०/- रुपये किंमतीचा अवैध गुटखा, तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला.या प्रकरणी संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला पोलीस नाईक विलेश सदाशिव सोनवणे यांच्या फिर्यादी वरून स्वंतत्र्य शिखरचंद जैन (वय-३९) धंदा- व्यापार रा.धनगर गल्ली चोपडा याचे विरुद्ध भाग ५ गुरनं १५४/२०२० भादवि कलम ३२८,१८८, २७२,२७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास डीवायएसपी राजेंद्र रायसिंग व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमिला काशिनाथ पवार हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com