
जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिये दरम्यान सीईओंसमोर बदली विकल्पाचा कागद फाडून फेकणार्या चोपडा येथील शिक्षणविस्तार अधिकारी सुधाकर गोवर्धन गजरे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तडकाफडकी निलंबित केले होते.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात समुपदेशनाने दोन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात चोपड्याचे शिक्षण विस्तार अधीकारी सुधाकर गोवर्धन गजरे यांनी विनंती बदलीसाठी अर्ज केला होता.
मात्र, चोपडा पेसा क्षेत्रातील रिक्त परिस्थीतीमुळे ही बदली मान्य करता येणार नाही, असा समितीने निर्णय घेतला.
विनंती बदली मान्य न झाल्याने गजरे यांनी सभेतच सर्व अधिकार्यांसमोर फाडून फेकला होता. हे वर्तन गैरशिस्तीचे व कर्तव्यात कसूर असल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश सीईओ डॉ. आशिया यांनी तातडीने काढले. तसेच त्यांना मुक्ताईनगर मुख्यालयात थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.