
रावेर Raver|प्रतिनिधी
दत्त जयंतीच्या पर्वावर रावेरात चितोडे वाणी समाजाचा (Chitode Vani Samaj's) ५ वा वधू वर परिचय (bride introduction meeting) मेळावा संपन्न झाला.यात उच्च शिक्षित विवाह इच्छुक मूल-मुली यांनी उत्स्फूर्तपणे प्रतीसाद नोंदवला.
येथील माधवनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात चितोडे वाणी समाजाचा वधू वर परिचय मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील वाणी (जळगाव) होते.प्रमुख अतिथी म्हणून रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन डॉ. दत्तप्रसाद दलाल,शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष अशोक वाणी, राजेश यावलकर,बालाजी महाराज संस्थांचे चेअरमन कैलास वाणी,अशोक काशिनाथ वाणी,निलेश पाटील, सौ अंजली गडे,श्रीकृष्ण नवलखे (नाशिक) शिरीष वाणी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी जुळून येती रेशीम गाठी या वधू वरांचा परिचय असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन केले.यावेळी १२० वधूवरांनी परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष महेश अत्रे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे उपाध्यक्ष निलेश पाटील,सचिव उदयकांत वाणी, सुनील वामनराव वाणी, पंकज वाणी,किरण वाणी,दिलीप वाणी,प्रशांत श्रावक,प्रशांत वाणी,सुनील वाणी,शुभम पाटील, निशांत पाटील,अजिंक्य वाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश पाटील यांनी केले