जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 13 पासून किलबिलाट

दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा ऑफलाईन शाळा; गुणवत्तापूर्ण शिक्षणावर सीईओंचा भर
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 13 पासून किलबिलाट
शिक्षण

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाईन (School online) सुरु होत्या. मात्र आता येत्या 13 जूनपासून ऑफलाईन (Offline) अर्थात प्रत्यक्षात शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची वर्गात उपस्थिती राहणार आहे. 13 जूनपासून सुरू होणार्‍या प्राथमिक शाळांमध्ये पालकांनी अधिकाधिक संख्येने आपल्या पाल्यांना (children) शाळेत दाखल करावे, असे आवाहन जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया (ZP CEO Dr. Pankaj Asia) यांनी केले आहे.

शाळापूर्व तयारीसाठी (Pre-school preparation) पहिला शाळास्तर मेळावा 18 एप्रिल रोजी घेण्यात आला होता. त्यात 1हजार 821 शाळेतील 29 हजार 347 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र झाले होते. शाळापुर्व तयारी दुसरा मेळावा 15 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आपलं मूल हे शिकल पाहिजे असे प्रत्येक पालकांना वाटते.

जागतिक पालक दिनाच्या(World Parents' Day) निमित्ताने सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना 13 जूनला अधिक संख्येने शाळेत दाखल करावे. पालक म्हणून आपली जबाबदारी महत्वपूर्ण आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये दि. 13 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. आपलं मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता आपण आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे, जिल्हा परिषदेच्या(Zilla Parishad schools) शाळांमध्ये देखील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण (Quality teaching) देऊन तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली जात आहे.

सन 2021-22 मध्ये शाळाबाहेरची शाळा, शाळा बंद पण शिक्षण सुरु, व्ही स्कूल अ‍ॅप, गल्ली मित्र, एक गाव एक बालरक्षक, मिशन शिक्षण हमी पत्रक, पालक संपर्क अभियान असे विविध उपक्रम शिक्षण विभागाने राबवून विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते टिकवून ठेवलेले आहे व यापुढे हे नाते अधिक घट्ट करावयाचे आहे.

शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये सुध्दा अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्याच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू दिला जाणार नाही.मुलांच्या व्यक्तीमत्वाच्या चांगल्या विकासासाठी सर्वागीण शिक्षणासाठी, बौध्दिक विकास तसेच चांगले नैतिक मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने आजच संकल्प करु या की मी माझे मूल हे शाळाबाहय राहू देणार नाही, त्याला नियमित शाळेत पाठविणे हे माझे कर्तव्य आहे ते मी पार पाडीन. माझा पाल्य हेच माझे भविष्य आहे याची मला जाणीव आहे . चला तर मग आपल्या पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबध्द होऊया, असे आवाहन देखील सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

सीईओ डॉ.पंकज आशिया जिल्हा परिषद जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com