
सावदा Savada ता रावेर (प्रतिनिधी )
येथील रविवार पेठ आठवडे बाजारात खंडेराववाडी जवळ दि ४ रोजी सध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात ट्रॅक्टर (unknown tractor,) , मोटारसायकल (Motorcycle) व सायकलस्वार (Cyclist) यांच्यात तिहेरी अपघात (triple accident) झाला. या घटनेत १३ वर्षीय लहान मुलास (child) गंभीर दुखापत झाल्याने उपचाऱ्या दरम्यान मृत्यू (died) झाला. सायकलवरील तीन जखमी झाले आहे. त्यास पुढील उपचारात जळगांव येथे हलविण्यात आले आहे .
आठवडे बाजारात अज्ञात ट्रॅक्टर चालक भरधाव वेगात असताना त्याने रस्त्याचा विचार न करता जात असताना १३ वर्षीय बालक नूर मोहम्मद हा ओम कालनीतून जेवणाचा डबा घेऊन जात असताना त्याचे मागे एक मोटारसायकल तिब्बल शीट व सायकल चालक नूर मोहम्मद याचे मागे चालत असतांना वरील ठिकाणी भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टर याने ठोस मारली.
या घटनेत बालक नूर मोहम्मद यास डोक्याच्या मागील बाजूस नाका कानात जबरदस्त दुखापत झाल्याने त्यास प्रथम उपचारासाठी फैजपूर येथील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला.
तसेच मोटार सायकल क्र एम एच आर ८९२९ या दुचाकी वाहनांवर चालक गजानन भागवत सपकाळे व दोन मित्र यांचे सोबत जात असताना अज्ञात ट्रॅक्टर चालक याने धडक दिल्याने या तिहेरी अपघात बालकाचा मृत्यू होऊन तीन जण जखमी झाले.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो उप विनोद खंडबहाले करीत आहे.