मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् सुटीच्या दिवशीही कर्मचारी कामावर

मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् सुटीच्या दिवशीही कर्मचारी कामावर

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शासनातर्फे दि. 27 रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. त्याच्या तयारीसाठी शनिवारी अणि रविवारी सुटी असतानाही सर्व शासकीय कार्यालये सुरू होती. दरम्यान काही कार्यालयांमध्ये कर्मचार्‍याची संख्या मात्र तुरळकच दिसून आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगावात मंगळवारी हा कार्यक्रम होत आहे. शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे पत्र वाटप करण्यात येणार आहेत. याच्या तयारीसाठी शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीही शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आज सुरू होती.

जळगाव महापालिकेतही कामकाज सुरू होते. सर्वच विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सर्व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सुक्ष्म नियोजनाची बैठक घेतली. बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांसाठी सात मैदानांवर उतरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पाणी वाटप, स्वच्छता सुविधा यासाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच, सर्व मैदानांवर प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात येणार असून, जिल्ह्यातील नगरपालिकांकडून मोबाईल टॉयलेट व्हॅन महापालिकेने मागविल्या आहेत. महापालिकेचे कर्मचारी कार्यक्रमाच्या ठिकाणीही उपस्थित ठेवण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com