Photos # मुख्यमंत्री जळगाव जिल्हा दौरा हायलाईटस..

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या कृती गट
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या कृती गट

मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठ कर्मचार्‍यांना आंमत्रण

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या कृती गट व संघटनेकडून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारी आश्वासित प्रगती योजना सुरु करणे, आदी मागण्यांबाबतचे निवेदन संघटनेचे पदाधिकारी शरद पाटील, भैय्या पाटील व सुरेश चव्हाण यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांंनी विद्यापीठ कर्मचार्‍यांना मुंबईला या, चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी अजमल जाधव, आर.डी.पाटील, संजय सपकाळे, अशोक पाटील, आर.एम.पाटील, विलास बावीस्कर आदी उपस्थित होते.

मनपा गाळ्यांचे धोरण ठरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या जळगाव दौर्‍यात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांचेतर्फे विमानतळावर ना.गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे आदींच्या उपस्थित मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करुन निवेदन दिले. यावेळी राजस कोतवाल, माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे, तेजस देपुरा, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील, विलास सांगोरे उपस्थित होते. लवकरच गाळेधारकांसाठी योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी पदाधिकार्‍यांना दिले.

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावला येण्यापूर्वीच त्यांच्या दौर्‍यात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सकाळी 8 वाजेपासून मुख्यमंत्री जाणार्‍या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे सर्व पोलीस उपअधीक्षकाकडून बंदोबस्ताचा आढावा घेत होते.

Sam D.Photography

जळगावच्या सर्व मागण्या मार्गी लावणार

जिल्ह्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोळी समाजासह अनेक मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ना. शिंदे यांना दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तुमच्या सर्व ऊीर्ळींशीी लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावर उपस्थितीतांनीही टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.दरम्यान, एक शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला पचनी पडत नाहीये का? फक्त सोन्याचा चमचा घेऊन येणारेच मुख्यमंत्री व्हावे असं सांगत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

नऊ ग्रह मंडळाकडून मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत

महापालिकेतील नवग्रह मंडळ म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक अ‍ॅड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत यांच्यासह इतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे जळगावात जोरदार स्वागत केले.

भाषण थांबवित दिले कंत्राटी कर्मचार्‍यांना आश्वासन

पाळधीत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतांना सभेत आलेल्या एस. टी. महामंडळाच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी हातात फलक घेऊन आम्हाला देखील कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण थांबवित त्या कर्मकर्‍यांना तुमचा प्रश्न देखील मी मार्गी लावणार असल्याची त्यांना ग्वाही दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com