बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार

आठ जणांसह पुरस्कार प्राप्त प्रदीप तळवेलकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार
USER

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी (Jalgaon District Sports Officer) यांचे छत्रपती क्रीडा संकुलातील कार्यालयात खोटी बनावट (forged documents) कागदपत्रे सादर करत शिवछत्रपती क्रीडा संघटक (Shivchhatrapati Sports Component Award) पुरस्कार मिळवणारे प्रदीप तळवेलकर (Pradeep Talvelkar) यांच्यासह कागदपत्र तयार करण्यास मदत करणार्‍या 8 जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात (Jilla peth Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल (crime filed) करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार
मंत्री गिरीश महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शहरातील सालारनगर येथील सेवानिवृत्त क्रीडा संघटक फारुख शेख यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्ये स्वातंत्र्य चौकातील रहिवासी प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांना 2003 साली शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार मिळाला होता.

बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार
यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली - संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास : डॉ. आशुतोष पाटील
बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार
VISUAL STORY: होय....मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय.....

हा पुरस्कार खोटे व बनावट कागदपत्रे सादर करुन मिळविल्याची तक्रार सेवानिवृत्त क्रीडा संघटक फारुख शेख यांनी क्रीडा विभागाकडे केली होती. त्यानुसार चौकशीत खोटी कागदपत्रे सादर करत पुरस्कार मिळविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याबाबत सोमवारी फारुख यांच्या तक्रारीनुसार प्रदीप तळवेलकर व त्यांना खोटी व बनावट कागदपत्रे तयार करुन तो पुरस्कार मिळवून देण्यासाठी मदत करणार्‍या आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा जिल्हापेठ पोलिसात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेट

यांनी केले खोटे कादगपत्रे तयार

पुरस्कार प्राप्त प्रदीप प्रभाकर तळवेलकर रा. शिवप्रभात जिल्हापेठ स्वातंत्र्य चौक, ला. ना. शाळेचे क्रिडा शिक्षक प्रशांत जगताप रा. महावीर नगर, नागपूर धांतोली येथील एन. एस.एस.एमचे प्राचार्य डॉ. बी. पी. खिवसरा, अशोक दुधारे रा. पोखर कॉलनी, दिंडोरी रोड नाशिक, डॉ. उदय डोंगरे रा. औरंगाबाद, डॉ. ए. एम. पाटील रा. धांतोली नागपूर, एल. आर. मौर्य रा. नवी दिल्ली, प्रा. असीम खान अजमल खान, प्रा. डॉ. देवदत्त पाटील रा. मारवड ता. अमळनेर यांनी बनावट कागदपत्र तयार करण्यास मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार
डीपीडीसीच्या सभेत... आ.खडसेंचा ‘अभिमन्यू’

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com