छत्रपतींचा मावळा, स्त्रियांकडे वाईट नजरेने बघूही शकत नाही - आमदार मंगेश चव्हाण

सोशल मिडीयावर व्हायरल पोस्टची चौकशीसाठी गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदार - आमदारांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
छत्रपतींचा मावळा, स्त्रियांकडे वाईट नजरेने बघूही शकत नाही - आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात लोकप्रतिनिधींनी (people's representatives) अल्पवयीन मुलीवर (minor girl) अत्याचार (Tyranny) केल्याचे कथित प्रकरण (Alleged case) सध्या सोशल मिडिया व ऑनलाईन पोर्टल्स वर चर्चेत आहे, या अनुषंगाने आज माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन (MLA Girishbhau Mahajan) यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना (District Superintendent of Police) निवेदन (Statement) देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी (Inquiry) करण्याची मागणी (Demand) केली. यात भाजप नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी प्रतिक्रिया देताना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारा व राजकारण करणारा मी मावळा आहे, परस्त्री कडे वाईट नजरेने पाहणे देखील मी पाप समजतो. मात्र कालपासून माझ्यासह जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार यांच्या नावाने बातम्या ऑनलाईन पोर्टल्स व सोशल मिडीयावर प्रसारित केल्या जात आहेत.

त्यात विशेषतः लोकप्रतिनिधी व आमदारांचा उल्लेख वारंवार येत असल्याने जनमानसात संशयाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकारिता म्हणून त्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ऑनलाईन पोर्टल्स यांनी या बातम्या दिल्या असाव्यात मात्र अश्या घटनांमध्ये दखल घेण्याचा, गुन्हा दाखल करून तपास करण्याचा अधिकार असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडून याबाबत अधिकृत कुठलीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही माजीमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष करन पाटील व भाजप लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांना निवेदन देऊन ऑनलाईन पोर्टल्स व सोशल मिडिया यात आलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या बातमीची आपण गंभीरपणे दखल घ्यावी व सदर प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करून तथ्य व सत्य जनतेसमोर आणावे.

तसेच या बातम्यांच्या अनुषंगाने जाहीर खुलासा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक या नात्याने आपण करावा अशी विनंती केली, तसेच जो लोकप्रतिनिधी ४ ते ५ लाख जनतेमधून निवडून आलेला असतो त्याची अब्रू काही रस्त्यावर पडलेली नसते मात्र त्यांच्याविषयी जर संशय आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या कुणी सुपाऱ्या घेऊन लावल्या असतील तर त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून उत्तर देऊ, ज्यांनी ज्यांनी समाज माध्यमातून आमदार म्हणून लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे.

जेथे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष माझ्या नावाचा/ गावाचा/मतदारसंघाचा उल्लेख आढळलेला आहे व कोणतीही खातरजमा न करता तो प्रसिद्ध केला आहे अशा सर्वांविरुद्ध कायदेशीर लढा देण्यात येणार आहे त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही. यासंदर्भात विधिमंडळात संबंधितांविरुद्ध हक्कभंग दाखल करता येईल का याबाबत देखील ज्येष्ठांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. चांगल काम करणाऱ्याला बदनाम करायचा नवीन प्रकार जिल्ह्यात सुरु झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com