सुनील झंवर, जितेंद्र कंडारे विरोधात दोषारोपपत्र दाखल

बीएचआर घोटाळा ः सुनील झंवरचा उच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळला
सुनील झंवर, जितेंद्र कंडारे विरोधात दोषारोपपत्र दाखल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

डेक्कन Deccan येथे बीएचआर घोटाळ्याप्रकरणी BHR scam दाखल गुन्ह्यात कारागृहात असलेल्या सुनील झंवरचा Sunil Zanwar, जामीनअर्ज Bail application मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने High Court फेटाळून Rejected लावला आहे. जामीनअर्ज फेटाळण्यात आल्यामुळे झंवरचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून 28 नोव्हेंबर रोजी सुनील झंवर यांच्या तर त्यापूर्वी आक्टोंबर महिन्यात जितेंद्र कंडारे Jitendra Kandare विरोधात पुणे न्यायालयात Pune court दोषारोपपत्र Chargesheet दाखल करण्यात आले आहे.

जळगाव एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटीत गैरकारभार तसेच फसणुकीबाबत फिर्यादी रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात 25 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयात आतापर्यंत बीएचआर पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांच्यासह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित असलेल्या सुनील झंवर यास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 ऑगस्ट रोजी अटक केली आहे.

पोलीस कोठडीनंतर झंवरची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान झंवरने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्या जामीनावर मंगळवारी कामकाज झाले. यात उच्च न्यायालयने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तीवाद करत जामीन अर्जावर हरकत घेतली. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

आतापर्यंत चार दोषारोप पत्र दाखल

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंतच्या तपासात संकलित पुरावे तसेच चौकशी अंती आज 23 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पुणे येथील न्यायालयात सुजीत वाणी, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकर, कमलाकर कोळी यांच्या विरोधात 2 हजार 400 पानांचे पहिले दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यानंतर मार्च महिन्यात सुरज झंवर याच्या विरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. ऑक्टोंबर महिन्यात जितेंद्र कंडारे विरोधात तिसरे तर 28 नोव्हेंबर रोजी सुनील झंवर याच्याविरोधात चौथे दोषारोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com