विना परवानगी फलक लावणार्‍या चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगावात महापालिकेची कारवाई
विना परवानगी फलक लावणार्‍या चार जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहर महानगरपालिकाJalgaon Municipal Corporation

जळगाव - jalgaon

शहरातील बसस्थानक, आकाशवाणीचौक, बहिणाबाई चौक, महाबळ, ख्वॉजामिया चौक या भागात विना परवानगी लावलेल्या फलकांवर शुक्र्रवार १२ नोव्हेंबर रोजी (Municipal Corporation) महापालिकेने कारवाई केली होती. याप्रकरणी चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात (District Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील बहिणाबाई चौकातील लेवा बोर्डींग, बसस्थानक ते आकाशवाणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकात तसेच ख्वॉजामिया चौक परिसरात काही जणांनी महापालिकेची परवानगी न घेता विविध जाहीरातींचे, शुभेच्छांचे फलक लावले होते. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविली असता सदर फलकांबाबबत कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले.

त्यानुसार महापालिकेने कारवाई करुन सर्व फलक जप्त केले. याप्रकरणी रविवारी महापालिका कर्मचारी युवराज नारखेडे यांच्या फिर्यादीवरुन फलक लावणार्‍या चेतन किशोर शिंपी रा. पोलीस कॉलनी, चंदू आण्णानगर, निलेश संजय जोशी, सुनील विजय देशमुख, मिलिंद रमेश नाईक तिघे रा. जळगाव या चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com