अभिनेत्री कंगणा राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

अभिनेत्री कंगणा राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादी काँग्रेस महानगरसह महिला आघाडीचे पोलिसांना निवेदन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत (freedom) आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) करुन कंगणा राणावत (Kangana Ranaut) हिने भारतातील रहिवासी प्रत्येकाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल (Filed a crime) करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर (Nationalist Congress Metropolitan) तसेच महिला आघाडीच्या (Women's lead) वतीने शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात (District Peth Police Station) पोलीस निरिक्षकांना निवेदन (Statement) देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही करत कंगणा राणावत हिचा निषेध नोंदविला.

यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, प्रतिभा शिरसाठ, अमोल कोल्हे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, सुशील शिंदे, सुहास चौधरी, रुपाली पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्षा कोमल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वय दिव्या भोसले, आरोही नेवे, किरण राजपूत आदी उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र 1947 ला मिळाले नसून 2014 ला मिळाले आहे असे वक्तव्य करुन चित्रपट अभिनेत्री कंगणा राणावत हिने देशभरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

यावेळी निवेदन जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रामदास वाकाडे यांना देण्यात आले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका यावेळी कार्यकर्ते पदाधिकार्‍यांची घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com