
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) (Sub-Inspector of Police) परीक्षेत चाळीसगावचा विक्रांत मोरकर (Vikrant Morkar) याने राज्यात दुसरा (second in MPSC examination in the state) क्रमांक मिळवला आहे.
कष्टाला (hard work) संयमाची जोड असली की स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागत नाही, हे वाक्य खरे करत, विक्रांत मोरकरने नियमितपणे अभ्यास व मैदानी चाचणीची तयारी करत यश प्राप्त केले आहे. तो म्हणतो स्पर्धा परीक्षेची (Competitive exams) तयारी करणे अवघड आहे, मात्र अशक्य नाही. त्याने पदवीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून पूर्ण केले असून पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली व शारिरीक चाचणीचा सराव औरंगाबाद येथे भरत रेड्डी सरांच्या मार्गदर्शनाखाली केला.
तो येथील जेता सायन्स अकॅडमीचे (Jeta Science Academy) संचालक दिपकसिंग शंकरसिंग मोरकर व सौ. उपशिक्षिका शोभना दिपकसिंग मोरकर यांचा चिरंजीव व जेता अकॅडमीचे संस्थापक श्रीकांत दिपकसिंग मोरकर यांचा लहान भाऊ आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे चाळीसगाव तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक (Appreciation) होत आहे.