
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-
शहरातील धुळे रोड येथे घराच्या मागील गोठ्यात बांधलेल्या बारा गायींमधून (cows) दोन गायी अज्ञाताने चोरून (stolen) नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे रोड परिसरात राहणारे संतोष निंबा घटी यांचा दुग्ध व्यवसायाचा व्यवसाय आहे. घराच्या पाठीमागे गोठा बांधला आहे. त्यात एकूण १२ बारा गायी आहेत. दि, २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तर २६ डिसेंबर -२०२२ रोजी सकाळी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञाताने २५ हजार रुपये किं.ची जर्सी जातीची गाय व २० हजार रुपये किं.ची लाल पांढर्या रंगाची जर्सी जातीची गाय अशा ४५ हजार रुपये किं.ची दोन गायी चोरून नेली. याप्रकरणी मुलगा शंतनु संतोष घटी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.