
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
दोघे मुले मुंबईकडेे नोकरीस असल्याने, मोठ्या शहरात चोरी होते म्हणून आई-वडिलांकडे तालुक्यातील कोंगानगर(Konganar) येथे दागीने व रोख रक्कम ठेवली होती. परंतू गावांकडे देखील अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) त्याच्यावर हात साफ करत, तब्बल ३ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन (Stealing issues) नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस (police) स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
सावित्राबाई उत्तम चव्हाण ( रा.कोंगानगर, वाघले तांडा ता.चाळीसगाव) यांचे दोघे मुले हे मुंबई परिसरात राहतात. मोठ्या शहरात चोरी होते. म्हणून त्यानी त्यांच्या लग्नात मिळालेले व इतर सोन्या-चॉंदीची दागिने आईकडे ठेवण्यासाठी दिले होते. आईने आपल्या घराच्या किंचनमधील पांढर्या लोखंडी पेटीत ते दागिने व रक्कम ठेवली. दि,११ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून पेटीतील ५० हजार रुपये रोख व सोन्या-चॉंदीचे दागिने असा एकून ३ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. संकाळी चोरी झाल्याचे उघड झाल्यानतंर पेटी ही सावित्राबाई यांच्या घरापासून काही अतंरावर असलेल्या मक्क्याच्या शेतात मिळुन आली. परंतू त्यातून रक्कम व दागिने गायब होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सावित्राबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.