चाळीसगाव : डोगरी व तितुर नदींच्या पाण्याची पातळी वाढली

जोरदार पावसामुळे पुन्हा तिसरा पुर येण्याची शक्यता, प्रशासनातर्फे नारिकांना सर्तकतेचा इशारा
चाळीसगाव :  डोगरी व तितुर नदींच्या पाण्याची पातळी वाढली

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावासाने मंळवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. पाटणादेवी जंगल व चाळीसगाव परिसरात वादळी वार्‍यासह दमदार पाऊस झाल्यामुळे अवघ्या एका तासातच डोंगरी व तितुर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे शहरातील फर्ची पुल पाण्याखाली गेल्या होता. तर मोठ्या पुलापर्यंत पाणी आले होते. पावसामुळे दोन्ही नद्या दुथडी वाहत आहेत. त्यामुळे पुन्हा पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनातर्फे नदी काठच्या गावांना सुरक्षितता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानूसार मंगळवारी पुन्हा चाळीसगाव परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. गौताळा अभया अरण्य परिसरातील पाटणा जंगलात दमदार पाऊस झाल्यामुळे डोगर माथ्यावरुन वाहनार्‍या डोंगरी व तितूर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याची पातळी वाढल्याने शहरातील फर्ची पुल पाण्याखाली गेला. तर मोठ्या पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी चढले होते.

अचानक पाणी वाढल्यामुळे यावेळी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दोन्ही नद्यांना कुठल्याही क्षणी पुर येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनातर्फे नदी काठच्या गावांना सतर्कता बाळण्याचा ईशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात डोंगरी व तितूर नदीला दोनदा पुर येवून गेल्यामुळे आधिच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दोन पुरांमुळेे झालेल्या नुकसानीच्या जखमा ताजा असताना आता पुन्हा तिसर्‍या पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठचे शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com