
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -
शहरातील एका चौदा वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याचा गुन्हा चाळीसगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता, परंतु त्या बालकाचे अपहरण नव्हे तर मित्रांसोबत खेळताना नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
बालकाचा मृतदेह आज सकाळी नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. हि घटना दि. ५ रोजी घडली आहे. मयताचे नाव अयान ऊर्फ सोनू शेख असे आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.