चाळीसगाव : पाणी पुरवठा योजनेला मुदत वाढ देऊनही काम पूर्ण होईना !

चाळीसगाव : पाणी पुरवठा योजनेला मुदत वाढ देऊनही काम पूर्ण होईना !

अनेक भागात नवीन पाईपलाईन मधून पाण्याची प्रतिक्षा, पाणी पुरवठा योजनेमुळे रस्त्याचे काम रखडले

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहराला समान दाबाने पाणी पुरवठा व्हावा म्हणून गेल्या दोन वर्षांपासून वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामाचा कालवधी २४ महिने होता. मात्र योजनेचे काम ठेकेदारने वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्याला पुन्हा सहा ते आठ महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. परंतू तरी देखील अजुनही निम्म्याच्यावर भागात नवीन नळातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे अजुन किती दिवस लोकांना नवीन नळातून पाणी येण्याची प्रतिक्षा करावी लागेल असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शहरातील लाखो रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सुरु आहे. हे काम ९० टक्के झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू न.पा.च्या सर्वसाधरण सभेत तब्बल दोन वेळा या योजनेस मुदत वाढ देण्यात आली आहे. हे काम सहा झोनमध्ये चालू असून ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. आता काम अंतिम टप्प्यात असून नळाची स्टेटींग व फिटींगचे काम चालू आहे. शहरातील हिरापूर रोड व धुळे रोड भागातील टाकलेल्या नवीन नळातून नागरिकांना पाणीपुरवठा देखील केला जात आहे. परंतू अद्याप भडगाव रोड व घाट रोड भागात नवीन नळाचेे स्टेटींग व फिटींगचे काम चालू आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला नवीन पाईप लाईन मधून पाणी मिळण्यासाठी जानेवारी २०२२ ची वाट पाहवी लागणार असल्याचे बोलले जात आहे. पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला पुन्हा-पुन्हा मुदत वाढ दिल्यामुळे कामाच्या दार्जाबाबत देखील प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे रस्त्याचे काम रखडले-

चाळीसगाव नगरपरिषद हद्दीतील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. ज्या शहरांमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचेे काम सुरु आहे, त्याठिकाणी रस्त्यांची कामे ही सदर योजनापूर्ण झाल्यानतंरच करता येणार आहे. या याजेनेच्या कामामुळे रस्त्यांची काम रखडली आहेत. त्यामुळी कधी ही योजना पूर्ण होईल आणि कधी शहरात नवीन रस्ते तयार होतील याची प्रतिक्षा नागरिक करीत आहेत. परंतू ठेकेदाराला दट्या देवून पाणी पुरवठा योजनेचे काम सत्ताधारी व विरोधकांनी का ? वेळेत पूर्ण करुन घेतले नाही ? या मागणचेे नेमके ‘ आर्थिक ’ कारण अशी अनेक प्रश्‍न आता नागरिकांना पडत आहे. आणि त्यांची उत्तरे येणार्‍या न.पा.च्या निवडणुकीत नागरिक नक्कीच मागणार आहेत, यात दुमत नाही.

नवीन पाईप लाईन योजनेचे काम पूणे झाले असून सदस्यस्थिती स्टेटींग व फिटींगचे काम चालू आहे. येत्या दोन महिन्यात संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईनव्दारे पाणी पुरवठा सुरु होईल.

राजू वाघ, अभियंता पाणी पुरवठा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com