चाळीसगाव : एकाच छत्राखाली दहा शासकिय विभाग

मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीसाठी अर्थसंकल्पात १५ कोटी मंजूर, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
चाळीसगाव : एकाच छत्राखाली दहा शासकिय विभाग

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी-

तालुक्यांना सर्व विभाग (departments) एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (Central administrative building) असल्याने चाळीसगाव तालुक्यात देखील ती असावी अशी मागणी अनेक दशकांपासून होत होती. याबाबत आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी पुढाकार घेत याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) व महसुल विभागाकडून (revenue department) मंत्रालयात पाठवला. अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज दि.११ मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात (budget) १५ कोटी रुपयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी (Approval) मिळाली आहे.

अशी असेल इमारत-

यामुळे गेल्या अनेक दशकांचे चाळीसगाव वासीयांचे स्वप्न साकार झाले असून लवकरच सुसज्ज अशी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (Central administrative building) पाहायला मिळणार आहे.सुमारे १४ कोटी ६७ लक्ष २४ हजार रुपये अर्थसंकल्पात (budget) मंजूर झालेल्या या बहुचर्चित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत चाळीसगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारी जवळपास १० शासकीय विभाग एकाच ठिकाणी कार्यरत होणार आहेत. चाळीसगाव शहरातील शासकीय दूध डेअरी जवळील १५ हजार चौरस मीटर जागा देखील यासाठी आरक्षित करण्यात आली आहे. २ मजले असणार्‍या या इमारतीत(building) तळ मजल्यावर १८२७ चौरस मीटर व पहिल्या मजल्यावर १८०१ चौरस मीटर बांधकाम असणार आहे.त्यात प्रांताधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, वनविभाग कार्यालय, महसुल कार्यालय उभारली जातील. तसेच प्रशासकीय सोयीसाठी सभागृह, संगणक व सर्वर कक्ष, सेतू सुविधा कक्ष, लोक अदालत कक्ष देखील यात नियोजित आहेत.

चाळीसगावकरांचे स्वप्न पूर्ण होणार- शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध, महिला, व्यापारी, उद्योजक, आदी समाजातील सर्व घटकांचा दररोजचा संबंध शासकीय कार्यालयाशी (Government offices) येतो. मात्र अगदी किरकोळ कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाण्यासाठी वेळ, पैसा, श्रम वाया जात होते.लोकप्रतिनिधी (People's Representative) म्हणून काम करत असतांना चाळीसगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणारी शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणावीत अशी मागणी अनेक नागरिकांनी बोलून दाखविली होती. याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव (Proposal) महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करून मंत्रालयात सादर केला. विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची गरज मंत्री महोदयांसह प्रशासकीय अधिकारी यांना पटवून दिली. अखेर याला थेट अर्थसंकल्पात १५ कोटींची मंजुरी मिळाल्याने चाळीसगाव वासीयांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

-आमदार मंगेश चव्हाण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com