चाळीसगाव संघ ठरला पोलिस अधीक्षक चषक विजेता

एकच जल्लोष करत, विजयाचा आनंद साजरा...
चाळीसगाव संघ ठरला पोलिस अधीक्षक चषक विजेता

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

जळगाव पोलिस अधीक्षक चषक क्रिकेट स्पर्धेत (Superintendent of Police Cup cricket tournament) चाळीसगाव विभागाच्या संघाने (Teams of Chalisgaon division) बाजी मारली असून चषक पटकावला आहे. विजय मिळविल्यानतंर चाळीसगावच्या संघाने एकच जल्लोष करत, विजयाचा आनंद (joy of victory) साजरा केला.

जळगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे (Office of the Superintendent of Police) जळगाव येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात (final match) चाळीसगाव विभागाचे कर्णधार एपीआय दीपक बिरारी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. १० षटकात त्यांच्या संघाने १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात विरोधी संघ १० षटकात ५ गडी गमावून केवळ ९८ धावा करू शकला. त्यामुळे चाळीसगाव विभागाने २८ धावांनी विजय (victory) प्राप्त केला. सामानावीर म्हणून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे अंमलदार विनोद खैरनार, बेस्ट बॉलर म्हणून चाळीसगाव डीवायएसपी कार्यालयाचे गणेश नेटके यांना सन्मानीत केले.

चाळीसगाव संघाने जळगाव एलसीबी, जळगाव भाग, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर क्राईमच्या संघांना नमवले होते. तर अंतिम सामन्यात चाळीसगाव विभागाच्या संघाने जळगाव शहर वाहतूक शाखेच्या संघाचा पराभव करीत पोलिस चषक (Police Cup) पटकावला.या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले होते.

चाळीसगावच्या संघात एपीआय दीपक बिरारी, तुषार देवरे यांच्यासह अंमलदार दीपक पाटील, भटू पाटील, भूषण पाटील, नीलेश पाटील, मुकेश पाटील, गणेश नेटके, विनोद खैरनार, कुंदन राजपूत, एकनाथ चव्हाण, प्रदीप परदेशी, स्वप्नील परदेशी, प्रकाश चव्हाण आदींचा समावेश होता. चषक पटकावल्यामुळे चाळीसगावच्या संघाचे जिल्ह्यात कौतूक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com