चाळीसगाव आगारातून लालपरिची चाके पुन्हा गतीमान

८० टक्के बस फेर्‍या पूर्ववत, संपातील ३४३ कर्मचारी कामावर परतले, २३ जण संपात सहभागी
चाळीसगाव आगारातून लालपरिची चाके पुन्हा गतीमान

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव आगारात मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या (ST staff) एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत संपात सहभागी ९५ टक्केे कर्मचारी कामावर परतल्यामुळे चाळीसगाव आगारातून (Chalisgaon Depo) पूर्वीप्रमाणे ८० टक्के बस फेर्‍या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. तर सोमवारपासून पूर्णता; शंभर टक्के बस फेर्‍या पूर्ववत करण्याचे आगाराचे नियोजन आहे. यामुळे ऐन लग्नसराईमध्ये प्रवशांना सोय झाली असून एसटीचा प्रवास सुखकर होत आहे.

संपकरी कर्मचार्‍यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. कामावर परतणार्‍यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे आतपर्यंत चाळीसगाव आगारातील संपात सहभागी ३४३ कर्मचारी कामावर परतले आहेत. तर अद्याप २३ कर्मचारी संपात सहभागी आहेत.

बडतर्फ कर्मचार्‍यांना सुनावणी झाल्यानंतर कामावर घेेतले जात आहे. हळुहळु कर्मचारी कामावर आल्यामुळे चाळीसगाव आगारातून दररोज १५० बसेस सोेडण्यात येत असून १५ हजार कि.मी.चा प्रवास होत आहे. यात सोलापुर, पुणे, बुलढाणा, कल्याण, नाशिक, पुणे, जळगाव, धुळे, पारोळा (Solapur, Pune, Buldhana, Kalyan, Nashik, Pune, Jalgaon, Dhule, Parola) यासह ग्रामीण भागात दरेगाव, कुझर आदि ठिकाणी बससेवा नियमित सुरु करण्यात आली आहे. चाळीसगाव आगारातून आजघडीला ८० टक्के बससेवा पूर्वी प्रमाणे सुरुळीत झाली आहे. तर येत्या सोमवारपासून पूर्वीप्रमाणेच शंभर टक्के बससेवा सुरु करण्याचे आगाराचे नियोजन आहे. नियमित बससेवा सुरु झाल्यामुळे आगाराचे उत्पन्नात वाढ होत असून दररोज चार ते पाच लाख रुपये आगाराला मिळत आहे. शंभर टक्के फेर्‍याचे नियोजन झाल्यास हेच उत्पन्न ८ ते १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

जवळपास ९५ टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. उर्वरीतही लवकरच कामावर येण्याची आशा आहे. त्यामुळे सोेमवारपासून चाळीसगाव आगारातून एसटी पूर्ण क्षमतेने धावू लागेल,

संदीप निकम, आगार प्रमुख

Related Stories

No stories found.