चाळीसगाव : शिवपुतळा अनावरणाचा मुद्दा पेटला

भाजपाच्या एकतर्फी निर्णयामुळे थंडीत राजकिय वातावरण तापले
चाळीसगाव : शिवपुतळा अनावरणाचा मुद्दा पेटला

चाळीसगाव प्रतिनिधी chalisgaon

चाळीसगाव (Municipal Council) नगरपरिषदेतील नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या ३० डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे येथील (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Chowk) शिवाजी चौकात बसवण्यात आलेला पुतळा लोकार्पण सोहळा घाईघाईने दि,२९ डिसेंबरला न. पा. तील सत्ताधारी भाजपा नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी निश्चित केला असून या कार्यक्रमाची पत्रिकाही सोशलमिडीयावरुन फिरत आहे. तसेच शहरात मोठ-मोेठे बॅनर देखील लागले आहेत. त्यातच पुतळा परिसरातील कामे अपूर्ण असतांना पुतळा अनावरणाची घाई का? व शिवपुतळा साठी गेल्या अनेक वर्षांपासून झटणार संघटनाना विश्‍वास न घेता पुतळा अनावरण करण्यात येत असल्यामुळे यावर सोशल मिडियातून टिका होत आहे.

तसेच शहवि आघाडीच्या नगरसेवकांनी देखील न.पा.च्या मुख्याधिकार्‍यांनी भेट घेवून परवागी नसतांना पुतळ्याचे आनवरण कसे होत असल्याचा सवाळ उपस्थित केला आहे. त्यामुळे शिवपुतळा अनावरणाच मुद्दा चाळीसगावात चांगलाच पेटला असून पुन्हा शिवपुतळ्यामुळे ऐन थंडित राजकिय वातावरण तापणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com